प्रेम म्हणजे काय

 

प्रेम म्हणजे काय असते ..

प्रेम म्हणजे काय असते ..

प्रेम म्हणजे काय असते ..





प्रेम म्हणजे असते त्याचे ओरडणे

कि प्रेम म्हणजे असते तिचे रडणे.

प्रेम म्हणजे असते त्याचे वाट पाहणे

आणि तिचे नेमके उशिरा येणे.

प्रेम म्हणजे असते त्याचे रुसणे

प्रेम म्हणजे असते तिचे समजाणे.

प्रेम म्हणजे त्याचे समजणे

आणि ...तिचे...परत उशिरा येणे....





प्रेम म्हणजे असतो विश्वास,

श्वासात दरवळणारा,

प्रेम म्हणजे असतो वेळ,

मनाला समजावणारा,

प्रेम म्हणजे असतो चंद्र,

नसूनही असणारा,

प्रेम म्हणजे असतो रंग,

दुसर्यांना द्याला,

प्रेम म्हणजे असते शक्ती,

जग जिंकायला,

प्रेम म्हणजे असते प्रेम,

आणि फक्त प्रेम असते.......









प्रेमाला ही भाषा असते

शब्द असतात भावनेचे,

प्रेमाला ही वाचा असते

आवाज असतो प्रकाशाचा,

प्रेमाला ही रूप असते

सुगंधाचा फुलाच्या,

प्रेमाला ही रंग असतो

शांततेचा आत्म्याच्या,

प्रेमाला ही इच्छा असते

अस्तित्वाची मनाच्या,

प्रेमाला ही बंधन असते

चौकटीचे मुक्ततेच्या,

प्रेमाला हि प्रेम असते

प्रेमाचा प्रेमाच्या.......





प्रेम हे असच असते........

समजताना भावना अपुर्या

आणि सांगताना शब्द

आम्ही याला प्रेम म्हणतो.......





प्रेम म्हणजे काय असते ..